मकरंद अनासपुरे | |
---|---|
जन्म | मकरंद मधुकर अनासपुरे २२ जून, १९७३ (1973-06-22) (वय: ५१) बिडकीन, छत्रपती संभाजीनगर ,महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | चित्रपट |
पुरस्कार | स्टार स्क्रीन अवार्ड |
मकरंद मधुकर अनासपुरे (२२ जून, १९७३; बिडकीन - हयात)[१] हे मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवादफेकीसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. स. भु. महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर नाट्यशास्त्र विभागात होतो.
काही चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली आहे. ‘डॅबिस’ या चित्रपटाचे पटकथालेखन, दिग्दर्शन व निर्मिती त्यांची आहे.
मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे.. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले. चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेता मकरंद म्हणून अनासपुरेंकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या आहेत.
मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते नाना पाटेकर याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करतात.[२]